राज्यभरातली 626 एड्स उपचार केंद्र संपामुळे बंद

February 22, 2009 2:31 PM0 commentsViews: 3

22 फेब्रुवारी मुंबईअलका धुपकरमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची राज्यभरातली 626 उपचार केंद्र 20 तारखेपासून बंद आहेत. कारण संस्थेचे 2000 कर्मचारी 20 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलनावर आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानात या कर्मचा-यांचं आमरण उपोषण सुरू आहे. यापैकी 21 कर्मचा-यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईच्या जीटी हॉस्पिटलमध्ये ऍडमीट करण्यात आलंय.यापैकी गोंदिया केंद्राचे टेक्निशन अजय फलतोडे यांनी वैद्यकीय सेवाही नाकारली आहे. एडस नियंत्रण संस्थेतल्या कर्मचा-यांना लावलेली कंत्राटी पद्धत रद्द करावी, सहावा वेतन आयोग लागू करावा अशी युनियनची मागणी आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत काम सुरू करणार नाही, असा इशारा युनियननं दिलाय. 'आम्हीच आमचे' या एड्स पॉझिटीव्ह लोकांच्या संघटनेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.

close