मुंबई विद्यापीठात अटीतटीची लढत

January 15, 2014 9:36 AM0 commentsViews: 300

Image img_199932_mumbaiuniversity_240x180.jpg15 जानेवारी :  मुंबई विद्यापीठाच्या स्डुडंट कौन्सिलच्या अध्यक्ष आणि सचिवपदासाठी आज अटीतटीची निवणूक होणार आहे. या निवडणुकीत मनविसे आणि काँग्रेस प्रणित NSUI यांच्यात सामना होणार आहे.

या उत्कंठावर्धक निवडणुकीत एकूण 14 कॉलेजचे जीएस मतदार आहेत. त्यापैकी 3 जीएसनी बहिष्कार टाकला आहे. तर एक जीएस तटस्थ राहणार असल्याच जाहीर केल आहे. बाकी 10 मतदारांपैकी मनविसे आणि NSUI यांच्याकडे प्रत्येकी 5 जीएस आहेत. त्यामुळे मताधिक्य मिळवून कोण विजयी होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत युवासेनेन माघार घेतलीय. तसेच मतदानावर बहिष्कार घातलेल्या 3 जीएसनी त्यांना धमकी देणं ,अपहरण करणं आणि लाच देण्याचे प्रकार होत असल्याचे गंभीर आरोप विद्यापीठाकडे केले आहेत.

close