दिल्लीत पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार

January 15, 2014 10:46 AM0 commentsViews: 2052

GANG-RAPE-sl-21-12-201215 जानेवारी : राजधानी दिल्लीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. डेन्मार्कमधील 51 वर्षांच्या महिलेची लूट करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण दिल्ली पुन्हा एका हादरली आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनबाहेर मंगळवारी रात्री ही घटना घडली. पीडित महिला मागच्या एक आठवड्यापासून भारतभ्रमणासाठी आली होती. संध्याकाळच्या सुमारास दिल्लीत फिरून पहाडगंज या भागात हॉटेलकडे जात असताना रस्ता चूकल्याने तिने आठ जणांच्या टोळीतल्या मुलांना रस्ता विचारला. याचाच फायदा घेत आरोपींनी रस्ता दाखवतो असं सांगत तिला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या एका कोपर्‍यात न्हेलं. तिथे या नराधमांनी तिला लुटलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला

या महिलेच्या तक्रारीवरून पहाडगंज पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.पीडित महिलेने वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिला असून ती पुन्हा तिच्या मायदेशी गेल्याचं पोलीसांनी सांगितल. पोलीसांना या प्रकरणी काही जणांची ओळख पटली असली तरी कोणालाही अटक मात्र करण्यात आली नाही.

विदेशी महिलांसोबत घडलेली मागच्या दोन महिन्यांतली ही तिसरी घटना आहे. यापूर्वी गोवा आणि मथुरा इथे विदेशी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या.

close