‘आम आदमी’त पुन्हा धुसफूस

January 15, 2014 4:50 PM0 commentsViews: 1084

vinod beeni15 जानेवारी : दिल्लीत आम आदमी पक्षाने सरकारने स्थापन केल्यानंतर काही महिने उलटत नाही तेच नाराजांनी डोकवर काढलंय. ‘आप’चे आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी आपल्या पक्षाला घरचा अहेर दिलाय. पक्षाच्या कारभारावर बिन्नी यांनी नाराजी व्यक्त केलीय.

लोकांना दिलेली वचनं पूर्ण करण्यात पक्ष अपयशी ठरलाय असा आरोप बिन्नी यांनी केलाय. या वक्तव्यामुळे बिन्नींवर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारलं असता, आपण याबाबत काही ऐकलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

विशेष म्हणजे खातेवाटपाच्या वेळी बिन्नींना मंत्रीपद नाकारलं गेलं होतं. त्यावेळी आपण मोठा गौप्यस्फोट करणार अशी इशारा बिन्नींनी दिला होता. पण आपच्या नेत्यांनी वेळीच बिन्नींची मनधरणी केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला होता. पण आता पुन्हा बिन्नी यांनी बंड पुकारले आहे.

close