सरकार लागले कामाला, 13 प्रस्ताव मंजूर

January 15, 2014 5:41 PM1 commentViews: 1695

ajit pawar cm415 जानेवारी : लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच, राज्य सरकारने निष्क्रियतेचा आरोप झटकून टाकण्यासाठी बैठका घेण्याचा धडाका लावलाय. बुधवारी पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत 13 प्रस्ताव मान्य झाल्याचं समजतंय.

गृह, जलसंपदा, महिला व बालविकास, आदिवासी विकास, नगरविकास आदी विभागांच्या प्रस्तावांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आलं. तसंच या बैठकीत वीज दर कपातीच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता होती, मात्र तशी चर्चा झाली नाही. दरकपातीबाबत राज्य सरकारनं उद्योगमंत्री नारायण राणे समिती नेमली होती, या समितीनं आपला अहवालही सादर केला होता.

तसंच प्रदेश काँग्रेससह काही नेत्यांनी वीज दरकपातीची मागणी केलीये. त्याशिवाय कालच महायुतीनं सत्तेत आल्यास वीजदरात 50 टक्के कपातीची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत त्यावर काही चर्चा होते का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

- मंत्रिमंडळाचे निर्णय

 • - धरणातलं पाणी बिगर सिंचन कामासाठी आरक्षित करण्याच्या 40 प्रस्तावांना मान्यता
 • - मान्यता दिलेल्या 40 पैकी 33 औद्योगिक तर 7 पिण्याच्या पाण्यासाठीचे प्रकल्प
 • - जवाहर, धडक विहिरीची कामं मनरेगामार्फत होणार
 • - 25 हजार विहिरींची कामं मनरेगामार्फत होणार
 • - गुन्ह्यात बळी पडलेल्या व्यक्तीच्या वारसासाठी व्हिक्टीम कॉम्पेन्सेशन योजना
 • - गुन्ह्यात अपंगत्व आल्यास 50 हजार
 • - ऍसिड हल्ल्यातल्या पीडितांना 3 लाख रुपये
 • - बळी पडलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास तातडीनं 2 हजारांची मदत
 • - रोजगार आणि बेरोजगारांची मोजणी
 • - अनुदानित आश्रमशाळांमधल्या 137 वाढीव तुकड्यांना मान्यता
 • - शिक्षकांच्या 137 पदांना मान्यता
 • - मानखुर्दमधल्या चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या कर्मचार्‍यांना सरकारी वेतनश्रेणी लागू, वेतनाची थकबाकीही देणार
 • - करमणूक शुल्क जमा करण्याची जबाबदारी केबल ऑपरेटर्स आणि मल्टी सिस्टीम ऑपरेटर्सवर
 • Sham Dhumal

  निवडणुक आल्यानंतरच नेत्यांना जाग येते का?
  ४ वर्षे जनतेची आठवण येते नाही. निवडणुक जवळ आली की जनतेची
  आठवण कशी येते?

close