प्रायोजकांनी माघार घेतली नाही – मोदी

February 22, 2009 5:19 PM0 commentsViews: 1

22 फेब्रुवारीआयपीएलचा पहिला हंगाम सुपर हिट झाला. क्रिकेटचं हे आधुनिक रुप क्रिकेट फॅन्सनी चांगलंच उचलून धरलं. पण आयपीएलच्या या यशात क्रिकेट बरोबरच वाटा होता तो ग्लॅमरचा आणि स्पॉन्सर्सनी ओतलेल्या पैशाचा. गेल्यावर्षीच्या यशानंतर सहाजिकच सगळ्यांना उत्सुकता आहे ती दुस-या हंगामात आयपीएल कसं असेल याची. पण स्पर्धेची तयारी सरू झाल्या झाल्या पहिली बातमी आली ती या स्पर्धेच्या प्रमुख प्रायोजकांनी माघार घेतल्याची.अखेर स्वत: मोदींना मीडियासमोर येऊन या बातम्यात तथ्य नसल्याचं स्पष्ट करावं लागलं. युरोप अमेरिकेतल्या सगळ्या श्रीमंत देशांना सध्या मंदीने ग्रासलंय.आणि त्याचा फटका मोठ्या उद्योगांना बसलाय. त्यामुळे आयपीएलच्या प्रसिद्धीवर खर्च करायला कंपन्यांकडे पैसा नाही. बिग टीव्ही ह्या रिलायन्सच्या कंपनीकडे आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क होते. पण त्यांच्याकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचं बोललं जातंय. मोदींनी मात्र कोणत्याही प्रायोजकांनी माघार घेतली नसल्याचं स्पष्ट केलंय.सेटमॅक्स बरोबरचा करारही कायम असल्याचं त्यांनी सांगितलंय.

close