सीए परीक्षेत अकोल्याचा गौरव श्रावगी देशात पहिला

January 15, 2014 10:13 PM0 commentsViews: 1021

15 जानेवारी : चार्टर्ड अकाऊंटंट अर्थात सीए या अत्यंत अवघड परीक्षेत अकोला जिल्ह्यातला गौरव श्रावगी यांने गौरवपूर्ण यश मिळवले आहे. गौरवने देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. गौरव श्रावगीला सीए परीक्षेत 66 टक्के मार्क्स मिळाले आहेत. अकोल्यासारख्या जिल्ह्यातून सीए परीक्षेत देशात पहिला येण्याची चमकदार कामगिरी केल्यामुळे सर्वत्र गौरवचं कौतुक होतं आहे. योग्य नियोजन, ध्येय आणि जिद्द हेच माझ्या यशाचं रहस्य असल्याचं गौरवने सांगितलं.

close