सेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे राजीनामा देणार

January 15, 2014 10:51 PM0 commentsViews: 3171

26236 l mhatre15 जानेवारी : मुंबईत शिवसेनेतला वाद चव्हाट्यावर आलाय. शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्या जाचाला कंटाळून नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.

आमदार विनोद घोसाळकर यांच्या दादागिरीला कंटाळून आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देत असल्याचं शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सांगितलंय.मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे आणि आपण शेवटपर्यंत शिवसैनिक राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. शीतल म्हात्रे सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

उद्धव ठाकरे आम्हाला न्याय देतील त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण अलीकडे विनोद घोसाळकर यांच्याकडून सेनेतील महिला नगरसेविकांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहे पण आज हा वाद विकोपाला गेला त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. पक्षातली ही विकृती जर अशीच सुरू राहिली तर सेनेतील अनेक महिलांसोबतही असंच होईल अशी व्यथा शीतल म्हात्रे यांनी मांडली. या प्रकरणाबद्दल उद्धव यांना जाणीव आहे. ते आम्हाला भेट देणार होते पण ती अजूनही झाली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र विनोद घोसाळकर यांनी आरोप फेटाळून लावले. आपल्यावरील आरोप खोटे आहे. महिला नगरसेविकांचा गैरसमज झाला अशी बाजू विनोद घोसाळकर यांनी मांडली.

close