स्वातचे समन्वयक खुशैल खानचं अपरहण

February 22, 2009 8:32 AM0 commentsViews: 3

22 फेब्रुवारीतालिबानने पाकिस्तानसोबत केलेली शांततेची बोलणी निष्फळ ठरण्याची चिन्ह दिसत आहेत. तालिबानने पाकिस्तान बरोबर शस्त्रसंधी लागू केल्यानंतर आज स्वात जिल्ह्याचे समन्वयक खुशैल खान यांच अपरहण केलं गेलं.त्यांच्यासोबत 6 सुरक्षारक्षकांचही अपहरण करण्यात आलं आहे. स्वात जिल्हातील मिंगोरा भागातून त्यांच अपहरण करण्यात आलंय. तालिबानचे प्रवक्त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारलीय.ते सुखरूप असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तालिबान आणि पाकिस्तान सरकारदरम्यान शांतता करार लागू करण्याची जबाबदारी खुशैल खान यांच्याकडे होती.

close