गायिका आशा भोसलेंना डॉक्टरेट

January 16, 2014 9:15 AM0 commentsViews: 441

Asha bhosle doctor 16 जानेवारी :  सहा दशकांपेक्षा जास्त काळ आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या आशा भोसले यांना भारती विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट ऑफ लेटर्स (डी.लिट) या पदवीने सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच विज्ञान व संशोधनातील योगदानाबद्दल भारतरत्न घोषित झालेल्या शास्त्रज्ञ सी एन आर राव यांना मानाची सर्वोच्च डॉक्टरेट ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. भारती विद्यापीठाच्या 15 व्या पदवीदान समारंभात विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांच्या हस्ते दोघानांही पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी सुवर्णपदकविजेत्या विद्यार्थांना आशा भोसले, सी एन आर राव यांचं डॉ.नरेंद्र जाधव यांनी अभिनंदन केल. आशा भोसले यांनी सर्वात मोठं प्रेम म्हणजे देशप्रेम आणि कर्तव्य म्हणजे देशसेवा असल्याचं म्हटलं. तसेच डॉक्टरेट मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

close