नाराज नगरसेविकांची पक्षप्रमुख भेट घेणार -आदित्य

January 16, 2014 1:31 PM0 commentsViews: 2004

sheetal aditya16 जानेवारी : शिवसेनेच्या नाराज नगरसेविका शीतल म्हात्रेंची समजूत काढण्याचे प्रयत्न आता सुरू झालेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: नाराज नगरसेविकांची भेट घेणार असल्याची माहिती खुद्द आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते अलिबाग इथल्या युवा सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

त्याच बरोबर, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी आज शीतल म्हात्रे यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. नाराज शीतल म्हात्रे यांनी काल राजीनाम्याचा इशारा दिल्यानंतर मातोश्रीवरून चक्रं फिरली. उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांनी रात्री हॉस्पिटलमध्ये जाऊन शीतल म्हात्रे यांची भेट घेतली आणि त्यांचं गार्‍हाणं ऐकून घेतलं.

दरम्यान, आमदार विनोद घोसाळकर यांच्याशी चर्चा करून या प्रकरणावर तोडगा काढू असं आश्वासनही नार्वेकरांनी म्हात्रे यांना दिलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी चौकशी समिती नेमावी, दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असं स्पष्टीकरण घोसाळकर यांनी आयबीएन लोकमतवर दिलं.

close