आदित्य ठाकरेंचा नवा मंत्र, 100 टक्के राजकारण करा !

January 16, 2014 5:04 PM0 commentsViews: 2625

235aditya thakare16 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही घोषणा देत विधानसभेवर भगवा फडकावला. पण हीच घोषणा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूर्णपणे पुसून टाकलीय.

यापुढे शिवसैनिकांनी 100 टक्के राजकारण करावं, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिलाय. जोपर्यंत 100 टक्के राजकारणातून सत्ता मिळत नाही तोपर्यंत समाजकारण करणं अशक्य असं त्यांनी म्हटलंय. यापुढे सर्वाधिक आमदार युवासेनेतूनच यायला हवेत असं आवाहन करताना जुन्या ज्येष्ठ नेत्यांना आदित्य यांनी एकप्रकारे इशाराच दिलाय.

अलिबागमध्ये युवा सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा सुरू आहे. या मेळाव्याचं उद्घाटन करताना आदित्य ठाकरे यांनी युवासेनेला मार्गदर्शन केलंय.

close