ए.आर.रेहमानला ऑस्कर

February 23, 2009 4:13 AM0 commentsViews: 5

23 फेब्रुवारी ज्या ऑस्करची सर्व भारतीय वाट पाहत होते. ते स्वप्नं प्रत्यक्षात साकार झालं. ए. आर. रेहमानला दोन ऑस्कर मिळाली. स्लमडॉग मिलेनियरला 8 ऑस्कर मिळाली. त्यात ए.आर रेहमानला बेस्ट ओरिजनल स्कोरसाठी तसंच ए.आर रेहमान आणि गुलजार यांना जय हो या गाण्यासाठी ऑस्कर देण्यात आलं आहे.रेहमाननं दोन ऑस्कर पटकावून ऑस्करमध्ये इतिहास घडवला. एक नजर रेहमानच्या कारकीर्दीवर.रेहमान 9 वर्षांचा असताना त्याचे वडील वारले. घर चालवण्यासाठी त्यांना वडिलांच्या म्युझिक स्टुडिओतली वाद्यं भाड्याने द्यावी लागली. पण म्युझिकवेड्या रेहमानचा प्रवास कुठल्याही आपत्तींनी थांबला नाही. पहिल्यांदा इलाई राजा यांच्याकडे किबोर्ड प्लेअर, नंतर एल शंकर आणि झाकीर हुसेन यांच्याबरोबर वर्ल्ड टूर. त्यानंतर रेहमानला स्कॉलरशिप मिळाली. आणि तो ऑक्सफोर्ड ट्रिनेटी कॉलेजमध्ये वेस्टर्न क्लासिकल म्युझिक शिकण्यासाठी गेला. जागतिक संगीताशी त्याची ओळख वाढत गेली. वेगवेगळ्या जिंगल्स आणि ट्यून्स बनवत बनवत तो मणिरत्नमपर्यंत पोहोचला आणि त्याला रोझा सिनेमा मिळाला. रूक्मिणी रूक्मिणी या रोझामधल्या गाण्यासाठी त्याने म्हातारा आवाज वापरला आणि तो आवाज चिरतरुण श्रृंगाराचा सिम्बॉल बनला. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही. बॉम्बे, रंगिला, दिल से, ताल, रंग दे बसंती, झुबेदा, लगान, गुरू, गझनी या हिंदी फ्लिमसाठी तसंच अनेक तमीळ, तेलगू फ्लिमसाठी त्याने संगीत दिलं. आपण ओळखतो त्या ए.आर.रेहमानचं खरं नाव, दिलीपकुमार. पण सुफी धर्मगुरू आणि सुफी संगीताच्या प्रभावामुळे त्याने इस्लामधर्म स्वीकारला.1988मध्ये त्याचं नामकरण झालंअल्लारखाँ रेहमान. रेहमानचा मेंदू आणि त्याची नजर फक्त नवीन कम्पोझिशनचं शोधत नसतात तर नवीन टॅलेंटच्याही शोधात असतात. योग्य टॅलेंटला योग्य संधी देण्यातही त्याच्यातला जिनिअस संगीतकार दिसतो. रूबरू गाण्यासाठी नॅशनल ऍवॉर्ड मिळालेल्या नरेश अय्यरला कधीकाळी चॅनेल व्ही सुपरसिंगर फायनलमधून वगळणयात आलं होतं, हे कोणाला खरं वाटेल? संगीताच्या क्षेत्रात तो अशा ठिकाणी आहे की तो म्हणेल ती पूर्व असते. आपल्या जादूई कम्पोझिशनवर जगाला नाचवून त्याने ख-या अर्थाने भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं.पदार्पणातच रेहमाननं नॅशनल ऍवॉर्ड पटकावलं. त्याने तीन नॅशनल ऍवॉर्ड, पद्मश्री गोल्डन ग्लोब, बाफ्ता ऍवॉर्डही मिळवले आहेत. त्याच्या संगीताने बॉलिवूडमध्ये खळबळ माजवली. त्यानंतर त्याच्या खात्यात ऍवॉर्डची भर पडतच गेली. इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर रेहमानची एन्ट्री झाली, ती शेखर कपूरच्या एलिझाबेथ सिनेमातून त्यानंतर 2002 साली आलं बॉम्बे ड्रीम्स. लॉर्ड ऑफ द रिंगसच्या नाट्यरूपांतरालाही त्याचाच स्वरस्पर्श झाला. आणि आता स्लमडॉग मिलेनियरच्या रूपाने त्याने ऑस्कर मिळवत इतिहास रचला.रेहमानची प्रतिक्रिया पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा

close