कोल्हापूर टोलमुक्त करण्यासाठी रस्त्यांचे होणार पुनर्मुल्यांकन

January 16, 2014 9:40 PM0 commentsViews: 266

Image img_71822_tolldhaad1_240x180.jpg16 जानेवारी : कोल्हापूर शहरातल्या टोलबाबत आज (गुरूवारी) महापालिकेनं रस्ते विकास प्रकल्पाच्या पुनर्मुल्यांकनाचा ठराव मंजूर केला आहे. शहरात टोलविरोधातल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यानंतर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी आयआरबी कंपनीचे पैसे महापालिकेमार्फत देण्याचं स्पष्ट केलं होतं.

पण त्याला शिवसेना आणि प्रजासत्ताक सेवा संस्थेनं विरोध केला होता. त्यामुळे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. या सभेत पुनर्मुल्यांकन होईपर्यंत टोल रद्द करावा आणि त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी, असा ठराव मंजूर केला गेलाय.

त्याचबरोबर टोल वसुली होऊ नये, अशा आशयाचं पत्र राज्य सरकारला महापालिका पाठवणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातल्या रस्ते विकास प्रकल्पाचं पुनर्मूल्यांकन होऊन त्याची रक्कम आयआरबी कंपनीला द्यायची की नाही याचा निर्णय 30 दिवसांनंतर घेण्यात येणार आहे.

close