‘पिफ’मध्ये ‘फँड्री’ने मारली बाजी

January 16, 2014 9:47 PM0 comments

fandery16 जानेवारी : पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये फँड्री सिनेमानं बाजी मारलीय. पिफमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा बहुमान फँड्रीने पटकावलाय. सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी 5 लाख रुपयाचा पुरस्कार देण्यात आलाय.

फँड्रीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ऍवॉर्ड मिळालाय. तसंच फँड्रीचा अभिनेता सोमनाथ अवघाटेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

तसंच फँड्रीला सर्वोत्कृष्ट ऑडियन्स चॉइस ऍवॉर्डही मिळालाय. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठीही फँड्रीचं वरचढ ठरलाय. विक्रमअमलारीनं हा पुरस्कार पटकावलाय. एकूण फँड्री 5 पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.