अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे निधन

January 17, 2014 10:25 AM0 commentsViews: 330

Suchitra_Sen_as_Paro_in_Bimpal_Roy's,_Devdas_(1955)17 जानेवारी :  प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून आजारी असणा-या सुचित्रा सेन यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 
सुचित्रा सेन यांनी 1952 साली बंगाली चित्रपट शेष कोथाईपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1955 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट देवदासमध्ये केलेल्या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.

close