जय हो, स्लमडॉग मिलेनियर

February 23, 2009 4:54 AM0 commentsViews: 3

23 फेब्रुवारी 81 व्या ऑस्कर सोहळ्यात स्लमडॉग मिलेनियरने 8ऑस्कर अवॉर्ड मिळवले. ज्या ऑस्करची सर्व भारतीय वाट पाहत होते. ते स्वप्नं प्रत्यक्षात साकार झालं. स्लमडॉग मिलेनियरला जे 8ऑस्कर पुरस्कार मिळाले त्यात उत्कृष्ट फिल्म या महत्त्वाच्या अवॉर्डसहित डॅनी बोएलला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्करही देण्यात आला आहे. ज्या ऑस्कर अवॉर्डकडे सर्व भारतीयांचं लक्ष लागलेलं होतं ते संगीतातले दोन अवॉर्ड रेहमानने मिळवले. रेहमानला बेस्ट ओरिजनल स्कोरसाठी तसंच ए.आर रेहमान आणि गुलजार यांना जय हो या गाण्यासाठी ऑस्कर देऊन सन्मानित करण्यात आलं. याशिवाय बेस्ट सिनेमॅटॉग्राफीसाठी अँटनी डॉड मॅण्टल, बेस्ट ऍडप्टेट स्क्रीनप्लेसाठी सायमन ब्युफॉय यांना, बेस्ट एडिटिंगसाठी क्रिस डिकन्स आणि बेस्ट साऊंड मिक्सिंगसाठी रसूल पुकट्टी, इयन टॅप, रिचर्ड प्रयाक यांना ऑस्कर मिळालं. अशाप्रकारे स्लमडॉग मिलिनियरच्या खात्यात 8 ऑस्कर जमा झाले. बेस्ट ऍक्टरसाठीचा ऑस्कर शॉन पेनला मिल्कमधल्या अभिनयासाठी देण्यात आला. तर बेस्ट ऍक्ट्ररेससाठी द रिडर मधल्या भूमिकेसाठी केट विन्स्लेटला ऑस्कर देण्यात आला.लतादीदींची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा

close