मोनिका मोरे अपघात प्रकरणाची हायकोर्टाने घेतली दखल

January 17, 2014 3:58 PM1 commentViews: 1045

monika more accdent17 जानेवारी : मोनिका मोरे अपघात प्रकरणाची मुंबई हायकोर्टाने स्वत:हून दखल घेतलीय. याप्रकरणी कोर्टाने रेल्वे प्रशासनाला नोटीस बजावली आहे. रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वे -पश्चिम रेल्वेचे डीआरएम यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे.

दरम्यान, मोनिका मोरेला मुख्यमंत्री सहाय्यता निधातून दोन लाखांची मदत मिळणार आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सौमय्या शुक्रवारी दिल्लीत रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार आहेत. मोनिकाच्या पुनर्वसनाची आणि रेल्वेनं प्रवाशांची काळजी घेण्याची मागणी ते करणार आहेत.

मागिल आठवड्यात शनिवारी मोनिका घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल पकडत असताना प्लॅटफॉर्मवरील खड्यामध्ये पाय अडकून खाली पडली. यात तिचे दोन्हीही हात लोकलखाली आले. मोनिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुदैवाने मोनिकाचा जीव वाचला पण तिला दोन्ही हात गमवावे लागले. याप्रकरणी राजकीय पक्षांनी मोनिकासाठी धावाधाव केली. भाजप, काँग्रेस,मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मोनिकाची भेट घेऊन मदतीचं आश्वासन दिलं. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनानेही अपघात कसा घडला या प्रकरणाचा तपास करत आहे तपासाअंतीच मोनिकाला रेल्वे खात्यामार्फत मदत दिली असल्याचं रेल्वे खात्यांनी स्पष्ट केलंय.

 • Gajendra Jadhav

  “औन
  ड्युटी” ‘जी.आर.पी. आणि स्ट्रेचर हमाल कृपया स्टेशन मास्तर औफिस मध्ये
  संपर्क साधा’ ,हि रेल्वे स्थानकावरील उद्घोषणा वीस -वीस मिनिटे चालू असलेली
  आपण कधी ऐकली आहे काय?
  एखादया व्यक्तीला अपघात झाल्यावर होणारी उद्घोषणा या “औन ड्युटी” कर्मचर्यांना ऐकू कशी येत नाही ? कुठे असतात ते ?

close