व-हाडकार लक्ष्मणराव देशपांडे यांचं निधन

February 23, 2009 6:15 AM0 commentsViews: 2

23 फेब्रुवारी व-हाड निघालंय लंडलना या एकपात्री प्रयोगानं जगभर प्रसिद्ध झालेले लक्ष्मणराव देशपांडे यांचं पहाटे औरंगाबादमध्ये निधन झालं. ते 66 वर्षाचे होते, यकृताच्या आजाराने त्यांचं निधन झालं. काही दिवसांपासून ते औरंगाबाद हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्यांच्या व-हाड निघालंय लंडलना या एकपात्री नाटकाची गिनीज बुकात नोंद झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. आज सकाळी 11 वाजता त्याच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

close