धर्मगुरू सय्यदना यांच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, 18 ठार

January 18, 2014 3:33 PM0 commentsViews: 1556

23453674518 जानेवारी : दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना मोहम्मद बुर्‍हानुद्दीन यांच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी झाली यात 18 जणांचा मृत्यू झाला. तर 66 जण जखमी झाले. त्यातल्या 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

 

दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सैयदना मोहम्मद बुर्‍हानुद्दीन यांचं शुक्रवारी वयाच्या 102 व्या वर्षी निधन झालं. अंत्यदर्शनासाठी सय्यदना यांच्या घरासमोर मोठी गर्दी जमली होती. रात्री दीड वाजता सैयदना यांच्या घराचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतर जमलेल्या गर्दीची पळापळ झाली. आणि त्यामुळे ही चेंगरीचेंगरी झाली अशी माहिती पोलिसांनी दिलीये.

 

भेंडीबाजारमध्ये वडिलांच्या कबरीच्या शेजारीच सय्यदना यांना दफन केलं जाणार आहे. आज शनिवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. मुंबईतल्या भेंडी बाजार इथल्या सैफी मशिदीत त्यांचं दफन करण्यात आलं. अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता भेंडीबाजार, डंकन रोड, मोहम्मद अली रोड वाहतुकीसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टाळावा असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.

close