सुनंदा यांचा मृत्यू आकस्मिक अनैसर्गिक

January 18, 2014 4:11 PM0 commentsViews: 1792

88 sunanda pushkar18 जानेवारी : केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूबद्दल एक धक्कादायक खुलासा डॉक्टरांनी केलाय. सुनंदाचा मृत्यू आकस्मिक अनैसर्गिक झाल्याची खळबळजणक माहिती पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालीय.

 

तसंच सुनंदा पुष्कर यांच्या मृतदेहावर जखमांच्या खुणा होत्या असंही स्पष्ट झालंय. एम्स हॉस्पिटलमध्ये तीन डॉक्टरांच्या टीमने पोस्टमॉर्टेम केलंय. येत्या दोन ते तीन दिवसांत पोस्टमॉर्टेमचा अतिंम अहवाल मिळणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलंय.

 

एम्स हॉस्पिटलमध्ये शशी थरूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुनंदा यांचं पार्थिव ताब्यात घेतलं. सुनंदा यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी साडेचार वाजता लोदी रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. अंत्यसंस्कारानंतर दिल्ली पोलीस शशी थरूर यांची चौकशी करणार असून जबाब नोंदणी करणार आहे.

 

संबंधित बातम्या
 

» सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू

» शशी थरूर यांचे ISI एजेंटसोबत प्रेमसंबंध -सुनंदा पुष्कर

close