काँग्रेसच सर्वात मोठा जातीयवादी पक्ष -राजनाथ सिंह

January 18, 2014 2:00 PM1 commentViews: 265

Image img_234422_rajnathsingh34_240x180.jpg18 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी दिल्लीत भाजपच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी बोलताना भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार तोफ डागली. काँग्रेसच सर्वात मोठा जातीयवादी पक्ष असल्याचं ते म्हणाले. भाजपमध्ये चहावालाही पंतप्रधान होऊ शकतो, असं प्रत्युत्तर राजनाथ सिंह यांनी मणिशंकर अय्यर यांना दिलं.

शुक्रवारी पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपवर घणाघाती टीका केली होती. भाजपचा समाजामध्ये तेढ निर्माण करणार पक्ष असून लोकांची माथी भडकवण्याचं काम भाजप नेत्यांकडून केलं जातं अशी टीका सोनियांनी केली होती.

भाजपच्या बैठकीत लोकसभा निवडणुकींची रणनीती ठरवण्यात येणार आहे. निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा, यावर चर्चा होणार आहे. यूपीए सरकारचा भ्रष्टाचार हा मुद्दा भाजप केंद्रस्थानी करण्याची शक्यता आहे. उद्या बैठकीच्या तिसर्‍या दिवशी नरेंद्र मोदी बोलणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

  • bharatmorepatil.

    yes.yes.

close