जम्मू – काश्मिरमध्ये तणाव कायम

February 23, 2009 4:01 PM0 commentsViews: 4

23 फेब्रुवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये अजूनही तणाव कायम आहे. बारामुल्लामध्ये पोलिसांनी निदर्शकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा केला. त्यात सात जण जखमी झाले. श्रीनगरमध्ये झालेल्या लाठीमारात एकजण जखमी झालाय. बारामुल्ला आणि सोपोरमध्ये बंद पुकारण्यात आला होता. सोपोर शहरात काल लष्कराकडून गोळीबार झाला होता. त्यात दोन तरूण ठार तर एक जण जखमी झाला होता. त्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती चिघळलीय. काल शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. दोषी जवानांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत लोकांनी कालपासून निदर्शनं सुरू केली आहेत.

close