घोसाळकर म्हणतात, ‘तो मी नव्हेच’ !

January 18, 2014 7:12 PM0 commentsViews: 1169

vinod ghosalkar 4318 जानेवारी : शिवसेनेत ‘महाभारता’ला कारणीभूत समजले जाणारे शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी आता ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतलीय. नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केलेले सर्व आरोप घोसाळकर यांनी फेटाळले आहे. मी कोणत्याही नगरसेविकेला त्रास दिला नाही हे इतर पक्षांकडून केल गेलेले षडयंत्र आहे असा आरोप घोसाळकर यांनी केला.

तसंच मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले, तर शिक्षा भोगण्यास तयार आहे आणि जर आरोप सिद्ध झाले नाही तर मानहानी केल्याबद्दल शितल म्हात्रे आणि शुभा राऊळ यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल करू असा इशाराही त्यांनी दिला. घोसाळकर यांनी आज शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

मात्र त्यांच्याविरोधात दहीसर पोलीस स्टेशनमध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर घोसाळकरांनी बाजू मांडण्यासाठी पुढे आले. विनोद घोसाळकर यांच्या जाचाला कंटाळून नगरसेविका शितल म्हात्रे यांनी राजीनामा दिला होता. घोसाळकर महिला नगरसेविकांना अपमानस्पद वागणूक देतात असा आरोप म्हात्रे यांनी केलाय.

या प्रकरणी माजी महापौर शुभा राऊळ यांनी फेसबुकवरून ‘कृष्ण कोणी होईल का ?’ अशी पोस्ट टाकली होती त्यामुळे शिवसेनेतला वाद चव्हाट्यावर आला. आता हा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला आहे. घोसाळकर यांनी आपली बाजू जाहीर जरी केली असली मात्र अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा पक्षाचा अंतर्गत मुद्दा आहे म्हणून मौन बाळगलं आहे.

close