बलुचिस्तानात संयुक्त राष्ट्राच्या अधिका-याची हत्या

February 23, 2009 4:03 PM0 commentsViews: 2

23 फेब्रुवारी पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमध्ये अपहरण झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या अधिकार्‍याची हत्या करण्यात आलीय. जॉन सोलेकी असं त्याचं नाव आहे. बलुचिस्तान लिबरेशन युनायटेड फ्रंट या तालिबान पुरस्कृत अतिरेक्यांनी त्याची हत्या केल्याचा संशय आहे. जॉन याचं बलुचिस्तानमधल्या क्वेट्टा शहरातून 2 फेब्रुवारीला अपहरण झालं होतं. त्याला सोडण्याच्या बदल्यात सहा हजार बलुच लोकांना सोडण्याची मागणी अतिरेक्यांनी केली होती. या बलुच लोकांना पाकिस्ताननं कैद केल्याचा अतिरेक्यांचा दावा आहे.

close