गाझियाबादमध्ये जमावानंच केला न्यायनिवाडा

February 23, 2009 4:05 PM0 commentsViews: 2

23 फेब्रुवारी जमावानंच न्याय देण्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये घडलाय. गाझियाबादमधल्या बलरामपूर भागात चार चोरांना जमावानं बेदम मारहाण केली. त्यात त्या चौघांचाही मृत्यू झालाय. या भागातल्या एका प्रिन्सिपॉलच्या घरात सहा चोर घुसले होते. लोकांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी गोळीबार केला. त्यावर चिडलेल्या जमावानं या चोरांना बेदम मारहाण केली. त्यांना गाझियाबादच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. चौघा चोरांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर दोन चोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.

close