वोटिंग मशीनमध्ये निगेटिव्ह वोटिंगचं बटण येणार

February 23, 2009 4:08 PM0 commentsViews: 1

23 फेब्रुवारी निवडणुकीत नकारात्मक मतदान करण्याचा अधिकार मतदारांना असावा का, हा मुद्दा सुप्रीम कोर्टानं न्यायाधीशांच्या खंडपीठाकडं पाठवलाय. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या स्वयंसेवी संस्थेनं याविषयी एक याचिका दाखल केली होती. वोटिंग मशीनमध्ये आणखी एक बटन असावं. ज्यात मतदारांना एकाही उमेदवाराची निवड न करण्याचा पर्याय असावा, अशी याचिका या संस्थेनं दाखल केली होती. सुप्रीम कोर्टानं यावरचे आदेश राखून ठेवलेत. आणि हा मुद्दा लोकांच्या मूलभूत अधिकाराशी निगडीत असल्यानं विचारासाठी तो खंडपीठाकडं पाठवलाये.

close