‘शीला दीक्षित सरकारच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार’

January 18, 2014 9:41 PM0 commentsViews: 1316

arvind kejriwal interview_new18 जानेवारी : आम आदमी पक्षाचं सरकार शीला दीक्षित सरकारवर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार आहे असं म्हणत आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला थेट आव्हान दिलंय.

 

माझ्यावर पक्षाचा दबाव असल्याने मी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे अशी घोषणाही त्यांनी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आयबीएन नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत चौफेर फटकेबाजी केली.

 

यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांवरही हल्ला केला. दिल्ली पोलीस अत्यंत भ्रष्ट आहेत. त्यांना लाच दिल्याशिवाय कामं होत नाहीत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. दिल्ली पोलिसांना दिल्ली सरकारच्या अखत्यारित आणायची मागणीही त्यांनी केली.

close