शरण येणार नाही – लिट्टेचा निर्णय ठाम

February 23, 2009 4:09 PM0 commentsViews: 2

23 फेब्रुवारी श्रीलंकन लष्कराच्या वेढ्यात सापडलेल्या लिट्टेनं आता शस्त्रसंधीची तयारी दाखवलीये. पण, शरण येणार नसल्याचं लिट्टेनं सांगितलंय. श्रीलंका सरकारनं लिट्टेचं हे आवाहन धुडकावून लावलंय. मुलैथिवूमधल्या पुथू-कुडी-यिरप्पू या लिट्टेच्या शेवटच्या शहराला लष्करानं वेढा दिलाय. लिट्टेच्या नऊ बंडखोरांना ठार केल्याचा दावा लष्करानं केलाय. लंकेचं सैन्य या शहराच्या मुख्य भागापासून फक्त 400 मीटर दूर आहेत. हे शहर एकदा ताब्यात आलं की लिट्टेजवळ लपण्यासाठी जंगलाशिवाय कुठलाच पर्याय नाहीय. दरम्यान लिट्टेप्रमुख प्रभाकरन्‌ची पत्नी आणि दोन लहान मुलं श्रीलंकेच्या बाहेर पळून गेल्याचं समजतंय.

close