जीव मिल्खा सिंगला एशियन प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर

February 23, 2009 4:15 PM0 commentsViews: 9

23 फेब्रुवारी भारतीय गोल्फसाठी एक चांगली बातमी आहे. भारताचा गोल्फपटू जीव मिल्खा सिंग याला जॉनी वॉकर एशियन प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड घोषित करण्यात आलं आहे. हा ऍवॉर्ड त्याला दुस-यांदा देण्यात येतोय.गेल्या मोसमात जीवने खूपच चांगली कामगिरी केली. त्याने चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा तर एशियन टूरचे मेरिट टायटल तीनदा जिंकलं. जीव मिल्खाच्या या कामगिरीमुळे आता गोल्फमध्येही भारताचं वर्चस्व निर्माण होतंय हे नक्की.

close