दाभोलकरांच्या खुनाला पाच महिने पूर्ण, मारेकरी मोकाटच!

January 20, 2014 9:48 AM0 commentsViews: 184

dabholkar new20 जानेवारी : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज पाच महिने पूर्ण झाले आहेत. पण खुनी अजूनही मोकाट आहेत. जनतेच्या हितासाठी झटणार्‍या कार्यकर्त्याचा खून होतो, त्याचा तपास लावणं ही सरकारची जबाबदारी आहे. आम्हाला न्याय कधी मिळणार, असा सवाल अंनिसच्या कार्यकर्त्या आणि डॉक्टर दाभोलकरांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी विचारला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने जादूटोणाविरोधी कायदाही बनवला. पण शिवसेनेची आडमुठी भूमिका अजूनही कायम आहे. अघोरी अंधश्रद्धेला आमचा विरोध आहे. पण जर कोणी आमच्या श्रद्धेला हात घातला तर आम्ही कायदा मोडून, तोडून टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये काल त्यांची सभा झाली. दाभोलकरांच्या खुनावरून संशय घेऊन सरकार कोणाच्याही मागे लागले आहे आणि त्यातले खरे खुनी पळून गेलेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली.


close