ज्येष्ठ खासदारांनी धरले आदित्यचे पाय

January 20, 2014 9:15 AM0 commentsViews: 2998

aditya20 जानेवारी : तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे कुटुंबीयाच्या तिसर्‍या पिढीचे पाय धरल्याने राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगलीय. औरंगाबादमध्ये काल झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत खैरे हे आदित्य ठाकरेंचे पाय धरत असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर झळकले आणि नव्या चर्चेला उधाण आले.

वास्तविक पाहता चंद्रकांत खैरे हे शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाचे प्रामाणिक शिलेदार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पाय धरून आशीर्वाद घेण्यापर्यंत ठीक होते. मात्र शिवसेनेचे युवराज आणि युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या पाया पडल्यानं शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या सन्मानाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, आपण आदित्य ठाकरे यांचे पाय धरत नसून त्यांच्यासोबत हात मिळवत होतो असं म्हणत खैरे यांची डोळ्यांना दिसणार्‍या छायाचित्रांनाच आव्हान दिले आहे.

close