बाळासाहेबांच्या संपत्तीवरुन ठाकरे कुटुंबीयांमध्ये वाद

January 20, 2014 11:09 AM1 commentViews: 2194

thackray brothers20 जानेवारी : ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीबाबत आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपत्तीबाबत मुंबई हायकोर्टात प्रोबिट याचिका दाखल केली आहे तर या याचिकेला जयदेव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावर त्यांची स्वाक्षरी नाही असा जयदेव यांचा आक्षेप आहे तर मृत्युपत्रात संपत्तीबाबतच्या अनेक गोष्टींचा समावेश नाही असा आक्षेपही जयदेव यांनी घेतलाय.

माझ्या वडिलांनी पूर्ण आयुष्य मराठीच्या मुद्द्यासाठी आणि मराठी माणसासाठी वेचलं. त्यामुळे ते इंग्रजीत मृत्युपत्र लिहितील हे पटत नाही. त्यांना माझ्याबद्दल आपुलकी होती आणि ते माझ्या संपर्कात होते. त्यांनी माझ्यासाठी संपत्तीत वाटा सोडला नाही, हे पटायला जड जाते अशा शब्दांत जयदेव यांनी आपला आक्षेप व्यक्त केला आहे.

संपत्ती आणि बँकेतल्या ठेवींचे एकूण मूल्य 14.85 कोटी असल्याचं उद्धव यांनी प्रोबिट याचिकेत म्हटलं आहे तर बाळासाहेब ठाकरे वांद्र्यातल्या ज्या मातोश्री बंगल्यात राहत होते त्याचीच किंमत 40 कोटी असल्याचं जयदेव यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर बँकांमधल्या ठेवी, दागिने यांचं मूल्य कोट्यवधी रुपये असून ते मृत्युपत्रात दाखवलेलं नाही असाही जयदेव यांचा मुख्य आक्षेप आहे. याबाबत जयदेव यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केलंय.
दरम्यान, माझा मुलगा उद्धव नेहमीच माझ्यासोबत होता. मी आजारी असताना त्याने मला शक्ती दिली. मातोश्री उभारण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याने शांततेत आयुष्य जगावं, अशी माझी इच्छा आहे. मला खात्री आहे की उद्धव जबाबदारीने वागेल आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये सलोखा राखेल असं बाळासाहेब उद्धव ठाकरेंबद्दल बोलले होते तर जयदेवबद्दलही मला आपुलकी आहे. पण काही वर्षांपूर्वी त्याने स्वत:हून मातोश्री सोडलं. त्याने आणि स्मिताने घटस्फोट घेतला आणि आता तो त्याच्या दुसर्‍या पत्नीसोबत दुसरीकडे राहतोय. या सर्व गोष्टींमुळे मी दुखावलोय आणि त्याला माझ्या संपत्तीतला कोणताही भाग न देण्याचा निर्णय घेतलाय असा उल्लेख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या मृत्युपत्रात केला आहे.

बाळासाहेबांनी कुणाला काय दिलं?

  • मातोश्रीचा पहिला मजला – ऐश्‍वर्या (नात, स्मिता आणि जयदेव ठाकरेंची मुलगी)
  • मातोश्रीचा दुसरा मजला – आदित्य आणि तेजस (उद्धव ठाकरेंची मुलं)
  • तिसरा आणि तळमजला – उद्धव ठाकरे
  • वांद्रे इथला प्लॉट आणि कर्जतचं फार्म हाऊस – उद्धव ठाकरे

बाळासाहेब उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलले ?
“माझा मुलगा उद्धव नेहमीच माझ्यासोबत होता. मी आजारी असताना त्याने मला शक्ती दिली. मातोश्री उभारण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याने शांततेत आयुष्य जगावं, अशी माझी इच्छा आहे. मला खात्री आहे की, उद्धव जबाबदारीने वागेल आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये सलोखा राखेल.”

जयदेव ठाकरेंबद्दल बाळासाहेब या मृत्युपत्रात लिहितात,

“जयदेवबद्दल मला आपुलकी आहे. पण काही वर्षांपूर्वी त्याने स्वतःहून मातोश्री सोडलं. त्याने आणि स्मिताने घटस्फोट घेतला आणि आता तो त्याच्या दुसर्‍या पत्नीसोबत दुसरीकडे राहतोय. या सर्व गोष्टींमुळे मी दुखावलोय आणि त्याला माझ्या संपत्तीतला कोणताही भाग न देण्याचा निर्णय घेतलाय.”

जयदेव ठाकरेंचा आक्षेप
“माझ्या वडिलांनी पूर्ण आयुष्य मराठीच्या मुद्द्यासाठी आणि मराठी माणसासाठी वेचलं. त्यामुळे ते इंग्रजीत मृत्युपत्र लिहितील, हे पटत नाही. त्यांना माझ्याबद्दल आपुलकी होती आणि ते माझ्या संपर्कात होते. त्यांनी माझ्यासाठी संपत्तीत वाटा सोडला नाही, हे पटायला जड जाते.”

  • Krishna Maselkar

    aata tumhala aandachya ukalya futat astil Thakare family cha waad ajun mith aani mirchi lawoon saang

close