औरंगाबादमध्ये गावक-यांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

February 24, 2009 4:57 AM0 commentsViews: 7

24 फेब्रुवारी औरंगाबाद माधव सावरगावेऔरंगाबादमध्ये गावक- यांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.औरंगाबाद जिल्ह्यातल्या पालमध्ये ही घटना घडली. रोहिदास तुपे असं या मृत तरुणाचं नाव आहे. गावक-यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदासचं गावातल्या एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. त्यातून त्यानं त्या मुलीवर चाकूनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गावक-यांनी त्याला मारहाण केली. रोहिदासला हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी रात्रीपर्यंत 73 जणांना अटक केली.

close