शिवसैनिक उभारणार बाळासाहेबांचं मंदिर

January 20, 2014 5:54 PM0 commentsViews: 733

344 nasik balasaheb20 जानेवारी : कर्मकांडाला कायम विरोध करणार्‍या प्रबोधनकारांच्या वारशाला शिवसैनिकांनीच काळं फासलंय. कारण नाशिकमध्ये अतिउत्साही शिवसैनिकांनी चक्क शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचाच घाट घातलाय.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचं योजलं आहे. बाळासाहेबांसोबतच त्यांच्या पत्नी मीनाताई यांच्याही पंचधातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचंही शिवसैनिकांनी ठरवलंय.

इतकंच नव्हे तर स्थापनेपूर्वी बाळासाहेब आणि मीनाताईंच्या मूर्तीची हत्तीवरुन मिरवणूकही काढण्यात येणार आहे. नाशकातील मुक्तांगण परिसरातील शिवमंदिरात बाळासाहेब आणि मीनाताईंच्या मूतीर्ंची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. नाशिकचे शिवसेना शहरप्रमुख संतोष बळीद आणि मनमाडचे शिवसेना नगरसेवक प्रवीण नाईक यांनी प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

जन्मभर कर्मकांडाला तीव्र विरोध करणार्‍या प्रबोधनकारांचा म्हणजेच बाळासाहेबांच्या वडिलांचाच वारसा शिवसैनिक विसरल्यानं चर्चेला उधाण आलंय. खुद्द बाळासाहेबांनीही अशा प्रकारच्या कर्मकांडाला आयुष्यभर विरोधच केला होता, या पार्श्वभूमीवर नाशकातील शिवसैनिकांच्या या अजब कृत्यानं शिवसेना नक्की कुठल्या वळणावर उभी आहे हा प्रश्न पडलाय.

close