शिवसेनेशी युती नाही- प्रफुल्ल पटेल

February 24, 2009 4:17 AM0 commentsViews: 1

24 फेब्रुवारी दिल्लीराज्यातल्या प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत शिवसेनेशी युती करण्याचा प्रश्नच नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्पष्ट केलं गेलं. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसचीही बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, गृहमंत्री जयंत पाटील तसंच राष्ट्रवादीचे राज्यातले सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. राज्यात आणि केंद्रात काँग्रेससोबत युती असताना दुस-या कोणत्याही पक्षासोबत युती करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी माहिती या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी दिली. निवडणुकांपूर्वी अशा अफवा नेहमीच उठतात, त्या फारशा गांभीर्यानं घेऊ नयेत, असंही पटेल म्हणाले.

close