‘रणजी’त महाराष्ट्राची टीम फायनलमध्ये

January 20, 2014 7:37 PM0 commentsViews: 679

ranji maha20 जानेवारी : यंदाच्या रणजी हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेल्या महाराष्ट्र टीमनं फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राने बंगालचा फक्त तीन दिवसात 10 विकेटनं धुव्वा उडवला.

पहिल्या इनिंगमध्ये 114 रन्सवर ऑलआऊट झालेल्या बंगालची टीम दुसर्‍या इनिंगमध्ये 348 रन्सवर ऑलआऊट झाली. महाराष्ट्रासमोर विजयासाठी फक्त 8 रन्सचं आव्हान होतं.

हर्षद खडीवाले आणि चिराग खुराना या महाराष्ट्राच्या ओपनिंग जोडीनं विजयाचा हा सोपस्कार फक्त दोन ओव्हरमध्ये पूर्ण केला. महाराष्ट्रातर्फे समद फल्लानं सर्वाधिक 10 विकेट घेतल्या.

close