बारावीच्या परीक्षेवर बहिष्काराचं सावट

January 20, 2014 8:23 PM0 commentsViews: 845

Image img_192722_tenexam_240x180.jpg20 जानेवारी : 3 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या बारावीच्या परीक्षेवर बहिष्काराच्या संकटाचं सावट आहे. पुण्यात ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेनं शिक्षण संचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मार्च 2013 मध्ये मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण ते पूर्ण न झाल्यामुळे शिक्षक संतप्त झालेत.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा, नाही तर बारावी बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. मुंबई, ठाणे आणि रायगडमाधल्या ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षक संघटनांनीही आज सोमवारी नवी मुंबईतल्या बोर्डाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.

नऊ महिने उलटूनही राज्य शासनाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या नसल्यांने शिक्षक संघटनेच्या वतीने हा धडक मोर्चा काढण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना 1 – 1- 196 पासून सुधारित त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करावी, कायम विनाअनूदान तत्व रद्द करून त्यांना अनुदान द्यावे अशा प्रमुख मागण्या शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशार शिक्षक संघटनेने दिला आहे.

काय आहे शिक्षकांच्या प्रमुख मागण्या ?

  • जानेवारी 1996 पासून त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करा
  • 42 दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत खात्यावर जमा करा
  • 2008-2009 पासूनच्या वाढीव पदांना मान्यता द्या
  • कायम विनाअनुदानित तत्त्व रद्द करा
  • विज्ञानाच्या प्रॅक्टिकल्ससाठी बाहेरून परीक्षक नेमा
  • ज्युनिअर कॉलेज प्रशासन स्वतंत्र करा
  • इंजिनीअरिंग परीक्षेसाठी ZEE रद्द करा
  •  2012-2013 पासूनच्या शिक्षकांना तात्काळ नियुक्ती मान्यता वेतन द्या

close