अखेर मोनोरेल धावण्यासाठी सज्ज, मुंबईकरांना दिलासा

January 21, 2014 9:23 AM0 commentsViews: 1380

monorail21 जानेवारी :  2010 पासून आपण सगळे ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला. मुंबईकरांचा प्रवास सुखद करण्यासाठी मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. महिनाअखेर मोनोरेल प्रवाशांच्या सेवेत हजर होईल.

मुंबई मोनोरेलबाबत सुरक्षेच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. सुरक्षा अधिकार्‍यांनी मोनोरेल सुरक्षित असल्याचा दिलेला अहवाल एमएमआरडीएने राज्य सरकारकडे सोपवला आहे. आता मोनोरेल कधी सुरू करायची याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेईल. एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत दाखल व्हायला सज्ज झालीय. त्याचं उद्घाटन 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान होण्याची शक्यता आहे.

मोनो रेल्वेचा पहिला टप्पा

– पहिल्या टप्प्यात एकूण अंतर 9 कि.मी.
– प्रत्येक 1 किलोमीटरवर स्टेशन
– पहिला टप्पा वडाळा ते चेंबूर
– पहिल्या टप्प्याचा एकूण खर्च 1500 कोटी
– तिकिटांचे दर 5 ते 11 रुपये

close