भरथंडीत पावसाच्या सरी

January 21, 2014 8:47 AM0 commentsViews: 715
paus21 जानेवारी : भरथंडीत मुंबईसह उपनगरात आज (मंगळवार) सकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते निसरडे झाल्याने दुचाकी गाड्या घसरल्याने किरकोळ अपघात झाल्याचे पहायला मिळाले.
 
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पारा खालावला होता. आता पाऊस पडल्याने थंडी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना गाड्या जपून चालविण्याचे आवाहन केले आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, लालबाग, सायन, मुंबई सेंट्रल या ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घडना जास्त घडल्या. हवामान विभागाकडून हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
close