निर्णय प्रलंबित राहिल्यामुळे 15 जणांची फाशी टळली

January 21, 2014 1:32 PM0 commentsViews: 442

supremecourt21 जानेवारी :  एखाद्या गुन्हेगाराच्या दया याचिकेवरील निर्णय राष्ट्रपतींकडून दीर्घकाळ प्रलंबित राहिला तर त्याचं रूपांतर जन्मठेपेत होणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने आज मंगळवारी दिला आहे. त्यामुळे आज 15 जणांच्या फाशीच्या निर्णयाचं जन्मठेपेत रूपांतर झालं आहे.

फाशी झालेल्या कैद्यांची दया याचिका सरकारने प्रलंबित न ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दया याचिकेवर निर्णय घेण्यासाठी वेळेचं बंधन असलं पाहिजे, निर्णयाला उशीर करणे हे अमानवी आहे तसंच जर दयेची याचिका फेटाळली गेली तर त्याची अंमलबजावणी 14 दिवसांच्या आत करा, असंही कोर्टाने सांगितलं आहे. आरोपी मानसिक रुग्ण असेल, स्किझोफ्रेनियाने ग्रस्त असेल तर त्याच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर होऊ शकतं असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

फाशीची शिक्षा झालेल्या सर्व आरोपींना कायदेशीर मदत देण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. आजचा निकाल देताना खलिस्तानी दहशतवादी देवेंदर पाल सिंग भुल्लरच्या फाशीचे रूपांतर जन्मठेपेत झालं आहे. तसंच राजीव गांधींचे मारेकरी आणि वीरप्पनच्या सहकार्‍यांनाही दिलासा मिळाला आहे. आजच्या निर्णयामुळे दया याचिकांवरील निर्णय लवकर देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयावर कोर्टाने अप्रत्यक्षरित्या दबाव टाकलाय, असं म्हणावं लागेल.

close