मुंबई भाजपनं अडवाणींना दिले अकरा कोटी

February 24, 2009 11:26 AM0 commentsViews: 2

24 फेब्रुवारीनिवडणुकांची तयारी आता सगळेच पक्ष करू लागले आहेत. निवडणुका म्हटल्या की आर्थिक गणित आलंच. यासाठी भाजपनंही तयारी केली आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना मुंबई भाजपच्यावतीनं 11 कोटींचा गौरवनिधी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातल्या फक्त तीन ठिकाणांहून तीन कोटींचा निधी पक्षाला मिळाला असल्याची माहिती अडवाणींनी दिली. तर राज्यभरातून 35 कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट भाजपचं आहे. गेल्या लोकसभेपेक्षा यावेळी भाजपनं आपल आर्थिक गणित दुपटीनं वाढवलंय.यावेळी अडवाणी यांनी केलेल्या भाषणात मुंबई हल्ल्यात शहिद झालेल्या पोलीस अधिका-यांचा खास उल्लेख केला. खास करून तुकाराम ओंबळे यांच्या आठवणीने अडवाणी गहिवरले.याचबरोबर सत्तेत आलो तर महाराष्ट्र आणि मुख्य म्हणजे मुंबईचा गुजरातच्या धर्तीवर विकास करू असंही त्यांनी सांगितलं

close