रघुनाथदादा पाटील यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

January 21, 2014 4:26 PM0 commentsViews: 1379

3466 raghunathdada patil21 जानेवारी : महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केलाय. मुंबईत झालेल्या ‘आप’च्या पत्रकार परिषदेत रघुनाथदादांनी या संदर्भातली घोषणा केलीय. गेल्या काही दिवसांपासून रघुनाथ दादा पाटील आपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेरीस आज मंगळवारी रघुनाथ दादांनी आपमध्ये जाहीर प्रवेश करुन चर्चेला पूर्णविराम दिलाय.

 

रघुनाथ दादा आपमध्ये आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आपची उपस्थिती जाणवणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे आपसोबत युती करण्याची शक्यता होती. पण राजू शेट्टी यांनी ‘आप’शी युती न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपुर्वीच त्यांनी महायुतीत प्रवेश केलाय. स्वाभिमानीने महायुतीशी घरोबा केल्यानंतर रघुनाथ दादांनी ‘आप’मध्ये प्रवेश केलाय.

 

आम आदमी पक्ष हा एका चळवळीतून उभा राहिलेला पक्ष आहे. नेत्या,पुढार्‍यांचा हा पक्ष नाही त्यामुळेच आम्ही ‘आप’मध्ये प्रवेश केला. राज्यात 3 लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात पण याबद्दल विरोधी पक्षांनी राज्य सरकारला जाब सुद्धा विचारला नाही. मागील वर्षी आम्ही यामुळे विरोधी पक्षांना सक्त ताकीद दिली होती यापुढे शेतकरी संघटना तुमच्यासोबत राहू शकत नाही असंही रघुनाथ दादांनी स्पष्ट केलं.

close