दाभोलकर खून प्रकरण : आरोपींना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

January 21, 2014 6:35 PM0 commentsViews: 518

dabholkar44421 जानेवारी : डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या नागोरी गँगचे सदस्य मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना पोलिसांनी 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

या दोघांनाही आज कोर्टात हजर करण्यात आलं. खून झाला त्या दिवशी आम्हाला ठाण्यात अटक केली. मग पुण्यात खून करून आम्ही ठाण्यात हेलिकॉप्टरने आलो का?, असा युक्तीवाद आरोपींनी केला. पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळेच आम्हाला गोवलं जातंय आणि गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी पैसे देऊ केले असा आरोपही त्यांनी केला.

पण, या दोघांकडून हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल हस्तगत करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. अखेर अधिक तपासासाठी कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली.

close