..आणि प्रेत उठून बसले !

January 21, 2014 8:08 PM1 commentViews: 7629

364 nagpur news621 जानेवारी : त्यांच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली.. एकीकडे तिरडी बांधणं सुरू होतं..तर दुसरीकडे कुणी हुंदके, अश्रूंना वाट मोकळी करुन देतं होतं. त्यांच्या पार्थिवाला आंघोळ घालण्यास सुरुवात झाली आणि अचानक मृत पार्थिवात हालचाल झाली आणि प्रेत उठून बसलं..मग काय जे पार्थिवाजवळ होते त्यांच्या तर थरकापच उडाला. पण ही घटना कोणत्याही सिनेमातील नाही तर ही घडना घडलीय नागपुरात. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडलाय.

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून काम करणार्‍या विनोद धरपाळ यांना पायाच्या ऑपरेशनसाठी शहरातील सनफ्लॉवर हॉस्पिटलमध्ये 18 नोव्हेबरला दाखल करण्यात आलं होतं. ऑपरेशननंतर त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. अखेर सोमवारी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

धरपाळ यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला. दुसर्‍यादिवशी सकाळी सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी एकत्र जमले. दुपारी बारा वाजता अंत्ययात्रेला सुरुवात करण्यापूर्वी मृतदेहाला आंघोळ घालण्यात आली. त्यावेळी लोकांना पार्थिवामध्ये हालचाल दिसली. मृतदेहाने डोळे उघडले आणि उठून बसले हे पाहून एकच गोंधळ उडाला. मृतदेह उठून बसल्याचं पाहून लोक चांगलेच घाबरले. पण दुसर्‍या क्षणाला ते जिवंत असल्याची खात्री झाली.त्यांनी विनोद धरपाळ यांना पाणी पाजले. तात्काळ त्यांना पुन्हा सनफ्लॉवर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण हा सगळा प्रकार डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे घडलाय. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे धरपाळ कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आता नातेवाईकांनी केलीय.

  • kadam

    ajb tuza nyay. ani te doctor

close