नवी दिल्लीत होणा-या कॉमन वेल्थ स्पर्धा धोक्यात

February 24, 2009 11:48 AM0 commentsViews: 5

24 फेब्रुवारी , नवी दिली 2010 साली नवी दिल्लीत होणा-या कॉमेनवेल्थ स्पर्धांचं आयोजन धोक्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पायाभूत सुविधा तयार नाहीत तर कॉमेनवेल्थ स्पर्धांवर गदा येणार आहे.पुढच्या वर्षी दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ स्पर्धांच्या आयोजनाला मोठा धक्का बसलाय. 2010च्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या संयोजनासाठी नवी दिल्ली तयार नसल्याचा निर्वाळा संसदेच्या स्थायी समितीने दिलाय. स्पर्धेच्या आयोजनावर त्यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. स्थायी समितीचे अध्यक्ष सीताराम येचुरी यांनी सादर केलेल्या अहवालात पायाभूत सुविध्या अपुर्‍या असल्याचं म्हटलंय. स्पर्धा बघायला येणारे पर्यटक आणि ऑलिम्पिक समितीचे अधिकारी यांची रहाण्याची व्यवस्था होईल अशी हॉटेल दिल्लीत नाहीत, असं या अहवालात म्हटलंय. आणि अशी हॉटेल उभारण्यासाठी पर्यटर मंत्रालयाला पुरेसा वेळ दिला नसल्याची तक्रार या अहवालात करण्यात आलीय. दिल्लीत एकूण 39 नवीन हॉटेल्स बांधण्याचा प्रस्ताव होता. पण प्रत्यक्षात फक्त 39 हॉटेल्सचं बांधकाम सुरू झालं आहे.

close