उद्या न्यूझीलंड VS भारत दुसरी लढत

January 21, 2014 11:23 PM0 commentsViews: 118

ind345678921 जानेवारी : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानची दुसरी वन डे मॅच बुधवारी हॅमिल्टनमध्ये खेळली जाणार आहे. पाच वन डे मॅचच्या सीरिजमध्ये भारत 1-0 अशा पिछाडीवर आहे. भारतीय टीममध्ये सांघिक कामगिरीचा अभाव आढळतोय.

 

गेल्या काही मॅचमध्ये भारतीय टीम विजयाच्या मार्गावर असताना काही बॅट्समन अचानक आऊट होतात, तर बॉलर्सना शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मार पडतोय आणि हातातोंडाशी आलेला विजय पराभवात बदलतोय. नेपियरमध्ये भारतीय टीमला याचाच फटका बसलाय.

 

विराट कोहलीवगळता इतर बॅटसमन फ्लॉप ठरताय, तर प्रमुख स्पीन बॉलर आर अश्विनला अजूनही सूर सापडलेला नाही. अश्विनची बॉलिंग बॅट्समन सहज खेळून काढत आहे आता हॅमिल्टनमध्ये विजयाची लय सापडलेल्या न्यूझीलंडला हरवण्यासाठी भारताला रणनिती बदलावी लागणार आहे.

close