लोकलमधून पडून एकाचा मृत्यू

January 22, 2014 10:13 AM0 commentsViews: 1285

Image img_194282_mumbailocal_240x180.jpg22 जानेवारी :मुंबईतल्या रेल्वे गर्दीने मंगळवारी एकाचा बळी घेतला. मुंब्रा आणि कळवा या स्टेशन्सच्यादरम्यान खच्चून भरलेल्या लोकलमधून पडून एकाचा मृत्यू झाला. रियाझ शेख असं या मृत व्यक्तीचं नाव आहे.

मुंब्रा-कळवादरम्यान मंगळवारी संध्याकाळी तीन अपघात घडले. यातील1 2 जखमींवर सायन हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. यात मोईन शेख हा 19 वर्षीय तरुण सध्या मृत्यूशी झुंज देतोय. त्याच्या डोक्याला जबर मार लागलाय आणि त्याला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय.

तर मंगळवारी सकाळी कळव्या जवळ रेल्वे ट्रॅकला तडा गेल्यामुळे अप-स्लो मार्गावरची वाहतूक खोळंबली होती. आणि त्यामुळे मुंब्रा आणि कळवा स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यातूनचा हा सगळा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

close