भारतासमोर 297 रन्सचं आव्हान

January 22, 2014 1:04 PM0 commentsViews: 754

indVSnz22  जानेवारी : दुसरी वन डे मॅचच्या सीरिजमध्ये आक्रमक बॅटिंग करणार्‍या न्यूझीलंडनं भारतासमोर 297 रन्सचं आव्हान  ठेवले आहे. पावसामुळे मॅच 42 ओव्हर्सची खेळवण्यात आली. पावसामुळे 42 ओव्हरच्या खेळवलेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं 271 रन्स केले पण डकवर्थ ल्यूईस नियमानुसार टीम इंडियासमोर विजयासाठी 297 रन्सचं आव्हान होत.

भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून पावसाची शक्यता असल्याने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. महंमद शमीने जेसी रायडरला 20 रन्संवर बाद करत भारताला चांगली सुरवात करून दिली. पण, मार्टीन गुप्टीलने केन विल्यम्सनच्या साथीने न्यूझीलंडचा डाव सावरला.
दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 89 रन्संची भागिदारी केली. अखेर गुप्टीलला बद्ली बॉलिंग रैनाने बाद केले. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या गुप्टील 44 रन्संवर बाद झाला. विल्यम्सनने मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावत न्यूझीलंडची धावसंख्या दीडशे पार नेली. संघाची 170 रन्स असताना पावसाने खेळ थांबला. त्यामुळे सामना 42 ओव्हर्सचा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर विल्यम्सन लगेच 77 रन्संवर जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. टेलर आणि अँडरसन यांनी आक्रमक बॅटिंग करत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या गाठून दिली. अँडरसनने अवघ्या 16 बॉलमध्ये 44 रन्संची खेळी केली. तर, टेलर 57 रन्स करून बाद झाला. भारताकडून महंमद शमीने तीन बळी मिळविले.
close