केजरीवाल येडा मुख्यमंत्री -शिंदे

January 22, 2014 9:22 PM3 commentsViews: 2995

Image shinde_300x255.jpg21 जानेवारी : दिल्लीत आम आदमी पार्टीने केलेल्या आंदोलनावर टीकेची झोड उठतेय. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तर आम आदमीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा थेट उल्लेख न करता ‘वेडा मुख्यमंत्री’ म्हणून खिल्ली उडवली आहे.

माझं लग्न झालं तेव्हा मुंबईत दंगल उसळली होती तेव्हा माझी सुट्टी रद्द झाली होती आणि हनीमूनला जाता आलं नाही. आता दिल्लीत तो वेड्या मुख्यमंत्री आंदोलनाला बसला होता त्यामुळे पोलिसांच्या सुट्‌ट्या रद्द कराव्या लागल्या, असं शिंदे यांनी म्हटलं.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी यांनीही ‘आप’ नाही देशासाठी ‘शाप’ आहे, अशी टीका केली आहे. शिंदे यांनी केजरीवाल यांची वेडा म्हणून खिल्ली उडवल्यामुळे आपच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. सुशीलकुमार शिंदे यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावं आणि माफी मागावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या सदस्या अंजली दमानिया यांनी केलीय. तसंच कालपर्यंत आमच्या भाषेबद्दल राजकीय पक्षांना आक्षेप होते, मग आता शिंदे यांच्या भाषेचं काय?, असा सवालही दमानिया यांनी विचारलाय.

  • Yogesh

    vedya mansanna Gruhmantri kelyavr asach honar. Evdhich Hanimoonla jaychi ghai hoti tr PSI kshala zale. Polisanchi kartavy jya mansala kalat nahi to gruhmantri honyachya laykicha aahe ka hech jantene tharvave.

  • विजय भिलारे, सातारा

    शिंदे साहेबाचे डोके ठीकाव्यावर आहे का ते पहा नसेल तर दवाखान्यामध्ये दाखल करा

  • Common Man

    Shinde Saheb tumchya sarkhe grahmantri milale he amche durdaiva………… mafi maga nahi tar ghari ja

close